Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कांदा पिकाची ई. पिक नोंदीची जाचक अट त्वरीत रद्द करावी – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Apr 3, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
महाराष्ट्र शासनाने कांदा पिकासाठी ३५० रूपये क्विंटल अनुदान जाहीर केले पण सातबारा उताऱ्यावर ई पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने सुमारे ९० % शेतकर्यांची ई पिक नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर अट त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना यांचेकडून आज तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण,परशराम शिदें,विशाल वडघुले,योगेश वाघ,भाऊसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पिक पेरा ई नोंद ही अट त्वरीत करावी व सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्यात यावे. तसे यंत्रणेला त्वरीत आदेश देवून पीक नोंदणीचे कामकाज करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हीडीओ) आठवडे बाजारात अनेक ठिकाणी पाइपलाइन चोकप ; त्वरित दुरुस्तीची फिरोझ शेख यांची मागणी

(बघा व्हीडीओ) आठवडे बाजारात अनेक ठिकाणी पाइपलाइन चोकप ; त्वरित दुरुस्तीची फिरोझ शेख यांची मागणी

मनमाड शहरातील आठवड़े बाजार परिसरातील ओम विश्वरूप गणेश मंडळ चौकातील नगरपालिकातर्फे ज्या दिवशी...

read more
मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैभवी धिंगे भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैभवी धिंगे भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील कनिष्ठ...

read more
एच. ए. के. हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज, मनमाड इयत्ता १० वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च – २०२२ निकाल ९८.६४%

एच. ए. के. हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज, मनमाड इयत्ता १० वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च – २०२२ निकाल ९८.६४%

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, नाशिक मार्फत फेब्रुवारी / मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]