Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – कांदा अनुदाना साठी १०० रूपयाच्या बाँडची जाचक अट – शेतकरी हवालदील

Apr 15, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
शासनाने  शेतकऱ्यासांठी कांदा अनुदान ३५० रूपये क्विंटल  जाहीर केले  त्यासाठी त्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत त्यापैकी कांदे जर मुलाच्या नावाने विक्री केले व ७/१२ वडीलाच्या नावावर असेल तर त्यासाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर  प्रतिज्ञापत्र तयार करून देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांना १०० रूपयाचा स्टॅम्प पेपरची अडचण येत आहे .यासाठी सध्या शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर  घेण्यासाठी गर्दी पहायला मिळत आहे.

नांदगाव शहरात काही मोजकेच मुद्रांक विक्रेते आहेत. त्यांच्याकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मुद्रांक विक्रेत्यांची संख्या कमी असल्यामुळे स्टॅम्प पेपर त्यांच्याकडेच असतात. शहरात गेल्या तीन दिवसांपासून स्टॅम्प पेपर नाही. बीएसएनएलची केबल तुटून तीन दिवस झाले तरी ती जोडण्यात न आल्याने शासनाच्या ट्रेझरीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.  ट्रेझरीत चलन भरता येत नसल्याने विक्रेत्यांना स्टॅम्प पेपर मिळालेले  नाहीत. जवळचा स्टॉक संपल्याने मुद्रांकांची टंचाई निर्माण झाली  आहे.शासनाने तहसील कार्यालय आवारात स्टॅम्प पेपर विकण्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांना परवानगी दिलेली आहे. मात्र नांदगाव तालुक्यात तुटवड्याचा फायदा घेऊन काही मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने मुद्रांक विक्री करत आहेत.नांदगाव जुन्या तहसील  आणि नवीन तहसील कार्यालयाबाहेर ही स्थिती दिसून  येत आहे. काही मुद्रांक विक्रेत्यांनी  मुद्रांकांच्या टंचाईचा गैरफायदा घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]