loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे गुड मार्निंग ग्रुपच्या वतीने ‘लालपरीचा’ 75 वा वाढदिवस साजरा….

Jun 3, 2023

मनमाड : येथे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांची रोजची जीवन वाहिनी असणारी ‘लालपरी’ अर्थात एसटीचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यांपासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे , अनेक वाड्या आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्‍काचे वाहन म्हणजे एस.टी होय. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला जागणारी जनसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात एसटी यंदाच्या वर्षी आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.

१ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली एस.टी धावली. यादिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुड मार्निंग ग्रुपच्या वतीने लासलगाव फाटा येथे मनमाड-नांदूरगड एसटीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रवीण शार्दुल , राजेंद्र जाधव , विवेक उबाळे , श्री गोयल, योगेश म्हस्के आदी सदस्य उपस्थित होते.सर्व एसटी कर्मचारी व प्रवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.!

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड जवळील कानडगाव जवळ हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी पलटली

बघा व्हिडिओ – मनमाड जवळील कानडगाव जवळ हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी पलटली

मनमाडकडून मालेगाव कडे येणाऱ्या रस्त्यावर हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी उलटली आहे, अपघातात...

read more
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला....

read more
लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड

सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी शेतमजूर अंध, अपंग,मतिमंद, अस्थिव्यंग, निराधार, मूकबधिर, कर्णबधिर,...

read more
पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी नाशिक येथे राबविण्यात येत आहे महिलांसाठी योग – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी नाशिक येथे राबविण्यात येत आहे महिलांसाठी योग – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नाशिक- २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी...

read more
.