loader image
[ays_poll id=7]

नांदगांव येथे आषाढी एकादशीला मांस ( मटन ) विक्री वर एक दिवसाची बंदी

Jun 28, 2023


नांदगांव सोमनाथ घोंगाणे
नांदगांव शहरातील हिंदु मुस्लीम समाजाच्या सदस्याचीं शांतता समीतीची बैठक नांदगांव पोलीस स्थानकात घेण्यात आली या बैठकीत आषाढी एकादशीला मांस ( मटन) विक्री केली जानार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला .
दि २९ रोजी आषाढी शुध्द एकादशी ( देवशायनी) व बकरी ईद तसेच पंढरपूर यात्रा ‘चातुर्मास्यारंभ
हे सर्व धार्मीक सन एकाच दिवशी येत असल्याने हिंदु मुस्लींच्या समाजाच्या जनभावना लक्षात घेता नांदगांव पोलीस स्थानकात हिंदु- मुस्लिम समाजाच्या विनंतीला मान देऊन एका बैठकीचे आयोजन केले असता बैठकीत आषाढी एकादशीला बोकडाची कुर्बानी देऊ नये तसेच मांस ( मटन ) विक्री करु नये या संदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात आला असून दि २९ रोजी नांदगांव येथे बोकडाची कुर्बानी दिली जानार नाही व मांस देखील विक्री होणार नाही सदर कुर्बानी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे .या बैठकीला पो नि रामेश्वर गाढे, सा पो नि दिपक सुरवडकर,पो उ नि पाटील,वाघमारे उपस्थीत होते तसेच बैठकीला हिंदु मुस्लीम पदाधिकारी देखील हजर होते या सर्वांच्या उपस्थितीत वरील निर्णय घेण्यात आला असून दि २९ रोजी आषाढी एकादशीला नांदगांव शहरात व पंचक्रोशीत मांस ( मटन )विक्री होणार नाही या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे .


अजून बातम्या वाचा..

.