एकात्मता सौहार्दता आणि त्यागाचे प्रतीक असलेला बकरी ईदचा सण मनमाड शहरात उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने मुस्लिम बांधवांनी साजरा केला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी शहरातील प्रमुख मशिदींसह सर्व मशिदींमध्ये बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. हिंदू मुस्लिम बांधवांनी परस्परांना बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊन एकात्मतेचे दर्शन घडवले. शहरात मुस्लिम बांधवांचा ईद कुल अजहा अर्थात बकरी ईद सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी तयारी केली होती. ईदगाह मैदानावर सामूहिक ईदचे नमाज पठण करण्यात आले. तसेच सर्व धर्मीयांसाठी प्रार्थना करण्यात आली. आज मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली. बकरी ईदचा सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच मशिदींमध्ये इथे नमाज पठण करण्यात आले मुस्लिम बांधवांना सर्व धर्मीयांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











