भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांची सहकार क्षेत्रा तील अग्रगण्य नामको बँकेच्या ग्राहक सेवा व तक्रार निवारण समिती वर नियुक्ती
येवला - भाजपा चे नासिक ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आणि उद्योजक आनंद शिंदे यांची सहकार क्षेत्रा तील...











