loader image

“एसएनजेबी”च्या गितिका बन्सल ची इन्फोसिस मध्ये निवड – साडेनऊ लाखांचे वार्षिक पॅकेज

Aug 14, 2023


चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित (स्व.) सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागात शिकणाऱ्या गीतिका बन्सल हिची इन्फोसीस या प्रतिष्ठीत आयटी कंपनीत निवड झाली. तिला नऊ लाख ५० हजार रुपयाचे वार्षिक पॅकेज कंपनीकडुन मिळाले आहे.

इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्यात नुसते पुस्तकी ज्ञान असणे पुरेसे नाही. याकरिता कंपन्यांमध्ये सध्या वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी

माहिती असणे व असे तंत्रज्ञान शिकणे ही काळाची गरज असून त्याच संधीचा फायदा घेत गितीका बंसल हिने हे यशाचे शिखर गाठले आहे. गीतिकाच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे

अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, अरविंदकुमार भन्साळी, झुंबरलाल भंडारी व
सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. आर. जी. तेड, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. संघवी, डॉ. पी. ए. कापसे व प्रा. जी.पी. ढोमसे आदींनी अभिनंदन केले. द


अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
.