अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून आज आंदोलकांनी विविध पद्धतीने पास घेऊन ३० ते ४० आंदोलकांनी मंत्रालयात प्रवेश केला आणि मागण्या संदर्भात घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा जाळ्यावर घोषणा देत आंदोलन केले. या शेतकऱ्यांचे १९७२ मध्ये धरणासाठी जमीन अधिग्रहन केले होते. मात्र या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, तसेच स्थानिकांना नोकरी देण्यात आलेले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते, आज हे आंदोलन मंत्रालयात केले आहे.

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!
आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...