Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर आणि परिसरात सर्जा-राजाचा “बैलपोळा” सण उत्साहात साजरा

Sep 15, 2023

मनमाड : ( योगेश म्हस्के )श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. या दिवशी त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल , सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे,
आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.सायंकाळी गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.

मनमाड शहर आणि परिसरात देखील पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील बुधलवाडी , दरगुडे वस्ती , वेशीतील मारुती मंदिर येथे शेतकरी बंधवांकडून आपल्या सर्जा -राजाला सजवुन , मारुती मंदिरासमोर मानवंदना देऊन वाजत गाजत पोळा सण साजरा केला करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]