मनमाड :
नाशिक येथील नाणे संग्राहक अच्युतभाई गुजराथी यांनी जनकल्याण रक्तकेंद्रात आपला वाढदिवस 100 वे रक्तदान करत साजरा केला. याप्रसंगी जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध विभाग डाॕ.दीपक मालपुरे ,सहकार्यवाह मदनजी भंदुरे , डाॕ . राजेंद्र भांबर , प्रशासकीय अधिकारी विनय शौचे , संचालक प्रदीप गुजराथी , रोटरीचे पराग पाटोदकर , मुकुंदभाई व हेमंतभाई गुजराथी आदी उपस्थित होते.
संचालक प्रदीप गुजराथी यांच्या हस्ते शतकवीर रक्तदाता अच्युत गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला.अच्युत गुजराथी यांनी रक्तकेंद्रास अकरा हजार ऐकशे अकरा रुपयांची देणगी दिली.उपस्थित मान्यवरांनी शतकवीर रक्तदात्यास शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मीनारायण परिवारातील ज्येष्ठ समाजसेवक राजाभाई गुजराथी यांसह संपूर्ण परिवार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.डाॕ. दत्तात्रय गुजराथी व डाॕ.विनोद गुजराथी यांसह अनेकांनी उस्फुर्त पणे रक्तदान केले. प्रा. दत्तासरांनी रक्तकेंद्रास पाच हजार रुपयांची देणगी दिली.
*शतकवीर रक्तदाते प्रदीप* *गुजराथी व दिलीप कोठावदे* *यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते* *करण्यात आला*
तरुणांनी रक्तदानास पुढे यावे असे विचार अध्यक्ष डाॕ. राजेश रत्नपारखी यांनी केले. सौ.नलिनी अच्युत गुजराथी यांनी रक्तवाढीसाठी आहारात बिटचा व पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे कल्पक व बहारदार सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय गुजराथी यांनी केले.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...












