राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश सुखदेव शिंदे हे बैल पोळा सणानिमित्त घरी आले होते.
काल दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव मार्गावर दुचाकीने जात असताना पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा, भाऊ भावजई असा परिवार आहे . त्यांचा मृतदेह देवळाली येथे रात्री हलवण्यात आला.
त्यांचा अंत्यसंस्कार शासकिय इतमामात करण्यात येणार आहे.
योगेश शिंदे यांच्या अपघाती निधनाने खडक माळेगाव,परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!
आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...












