मनमाड : ( योगेश म्हस्के) बालगोपालांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव , अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी नागरिकांची तयारी सुरू असुन त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सवासाठी बजारपेठेत गणपती मुर्तीचे अनेक दुकाने लावण्यात आले असुन विविध प्रकारच्या सुंदर अशी गणेशाची रूपे बघायला मिळत आहे. गणपतीच्या आकर्षक अशी सजावट आणि आरस करण्यासाठी देखील अनेक दुकाने सजलेली आहे .पुजेसाठी लागणाऱ्या साहित्याची अनेक दुकाने लावण्यात आलेली आहे , यंदाच्या वर्षी मुर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या काच्यामाला मागे साधारण 20 टक्यांनी वाढ झाली असुन , या मुळे यंदाच्या वर्षी गणपती मुर्तीच्या किमती वाढलेल्या आहे. नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी विविध वस्तुंची खरेदी करत आहे.
























