loader image

भूमी क्रिकेट अकॅडमी च्या शेख, निते, बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट अंडर 14 संघाच्या संभावित यादीत निवड

Sep 19, 2023


मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु हसन शेख, गौरव निते व राजरत्न बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 14 संघाच्या संभावित खेळाडुच्या यादीत निवड करण्यात आली आहे.
रविवार 17 सप्टेंबर 23 रोजी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 14 संघाची निवड चाचणी नाशिक येथे संपन्न झाली. या चाचणीसाठी नाशिक जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातुन अंडर 14 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग नोंदवला होता.मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु गौरव निते , हसन शेख व राजरत्न बागुल यांची संभावित खेळाडुंच्या यादित निवड झाली. या खेळाडुंना नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशनद्वारे होणार्या निवड चाचणी सामने खेळण्याची संधी मिळाली असुन या सामन्यांमधुन मनमाडच्या खेळाडुंकडुन चांगली कामगीरी होऊन नाशिक जिल्हा संघात निवड व्हावी अशा शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नाशिक जिल्हा संघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु कसुन सराव करत आहे. 19 सप्टेंबर 2023 पासुन हे सराव सामने नाशिक येथे खेळवण्यात येणार आहे.

या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, अंकित पगारे , श्रेणिक बरडिया , तय्यब शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन लाभले. श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.