loader image

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला संप – बळीराजा समोर मोठे संकट

Sep 21, 2023


मनमाड -नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या व
समस्यांवर काल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ बाजार समित्या व उपबाजार समित्यांत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून, आधीच दुष्काळी परिस्थिती अन् त्यात शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा मोठे संकट येऊन पडले आहे.

कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यातशुल्क यांसह इतर मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी मागे काही दिवसांपासून आंदोलन केले व बाजार समित्यांचा लाक्षणिक बंद देखील पुकारला होता. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारती पवार यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.

मात्र, त्या दिवसापासून मागण्या प्रलंबितच होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत देखील तोडगा न निघाल्याने बुधवार पासून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ बाजार समित्या तसेच उपबाजार समित्यांमध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

याचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून, आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात कांद्यासह शेतमालाचा कमी झालेला भाव यातून कसा मार्ग काढावा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे, कालपासून बाजार समिती बंद असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.


अजून बातम्या वाचा..

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.