मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाआतील मुलांच्या संघाने तृतीय स्थान संपादन केला. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे, अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदा हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव
मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...








