नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव येथील शिवकन्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ संगिता सोनवणे यांना मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने मराठा भुषण जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नांदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या शिवकन्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या सौ संगिता सोनवणे यांना मराठा सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मराठा भुषण जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संरक्षण मंत्री व खासदार सुभाष भामरे हे होते यावेळी विविध प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.पुरस्कार मिळाल्या बद्दल सकल मराठा समाजातर्फे तसेच सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
छत्रेच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून घडविले गणेशमूर्ती
मनमाड : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथे राष्ट्रीय...












