नांदगांव सोमनाथ घोगांणे
एरवी गुरुजी नाही किंवा मोडकळीस आलेली शाळा या कारणास्तव म्हणून शिक्षण अधिकारी,बिडीओ,तहसीलदार यांच्या दालनात, वरांड्यात शाळा भरलेल्या आपण पाहिल्यात पण आता तर चक्क जिल्हा बँकेच्या कार्यालयातच शाळा भरल्याचे चित्र नांदगांव येथे बघायला मिळाले त्याला कारण ही तसेच होते म्हणे नाशिक जिल्हा बँकेकडे
साकोरा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे साडे पंधराला लाख रुपये ( १५ /५० लक्ष) शाळेचा निधी बँकेच्या खात्यावर आहे तो निधी मिळत नाही त्यामुळे शाळा खोल्यांची कामे अर्धवट असल्याने मुलांना बसण्यासाठी वर्ग नाही बँकेत आडकलेले पैसे मिळावे म्हणून ९ वी व १० वी चा वर्गच बँकेच्या कार्यालयात भरविला हि घटना दि ६ ऑक्टोबर २३ रोजी वेळ सकळी ११ वा घडली मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक या वेळी उपस्थितीत होते.
झाले काय जिल्हा बँक नांदगांव शाखेत साकोरा ता . नांदगांव येथील कर्मवीर भाऊराव पाटील या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायाचा शाळेचा निधी १५:लाख ५६ हजार ६१० रुपये एवढा निधी बँकेच्या खात्यात आहे .दरम्यान विद्यालयाने शाळा वर्गाचे बांधकाम सुरु केले. त्यासाठी पैशांची गरज आहे बँकेत पैसे असताना ते
सात वर्षापासून
मिळत नाही त्यासाठी बँकेशी व वरिष्टासी पञव्यवहार केला पण बँकेकडून पैसे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा मोर्चा थेट साकोरा येथून पाच किमी अंतरावरून येऊन नांदगांव जिल्हा ग्रामीण बँकेच्या दालनात वर्ग भरविण्यात आला या दरम्यान बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची तारांबळ उडाली या दरम्यान बँकेचे तालुका विभागीय अधिकारी मांगीलाल डंबाळे यांनी सदर पैसे देण्याचे लेखी पत्र दिल्या नंतर सुरु असलेले उपोषन मागे घेण्यात आले या दरम्यान सध्या पाच लाख देण्याचे निश्चित झाले असून उर्वरित रक्कम जसजशी कर्ज वसुली होईल तसे तसे पैसे शाळेला देण्यात येथील असे लेखी आश्वासन दिल्यावर. बँकेत भरविलेले शाळेचे वर्ग मागे घेण्यात आले .यादरम्यान. माजी सरपंच
भगवान निकम,जिप सदस्य रमेश बोरसे, सोसायटी चेअरमन सतीश बोरसे, प्रा विनायक बोरसे,सुरेश बोरसे,किरण बोरसे,संतोश बोरसे,अमर सुरसे,दादा बोरसे,तानाजी कदम, श्रीमती जगताप ,तसेच शिक्षक पालक व विद्यार्थी या आंदोलानात सामील झाले होते.
दरम्यान सध्या व पावसाळ्यात वर्ग खोल्याची दयनीय अवस्था झाल्याचे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या दालनात भारलेली शाळा तालुक्यात जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली
दरम्यान जिल्हा बँकेची
थकबाकी २२०० कोटी,एवढी असून नांदगांव. तालुक्यातील कर्जाची थकबाकी ४७ कोटीएवढि आहे या संदर्भात बँकेची .कायदेशीर वसुलीची प्रक्रिया चालू असून या वर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका वसूलीला मारक ठरण्याची चिन्हे दिसतात तसेच सन २०१६ पासून नोंट बंदी झाल्या पासून नाशिक जिल्हा बँक ढबघाईस आली असून ठेवीदारांचे पैसे देणे कर्मचारी पगार यावर देखील कपात करण्यात आली असून त्याचे परीणाम जिल्हा बँकेच्या दैनंदिन कामकाजात पडत आहे.
एकंदरीत बँकेच्या कर्जाच्या थकीत वसुलीसाठी
अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्न करीत आहेत .















