loader image
[ays_poll id=7]

नीलमणी गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे ४१ हजाराची औषधे सेवा भारती कडे सुपूर्द

Oct 25, 2023

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी भाद्रपद गणेश उत्सव 2023 मध्ये
रु.41000/- किंमतीचे विक्रमी संकलीत औषधे सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द
मनमाड – मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो ….! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…! हे ब्रीद वाक्य घेऊन आजपर्यंत अखंडीतपणे 27 वर्षे विविध उपक्रमांद्वारे धार्मिक व सामाजिक आरोग्य सेवाकार्य करणार्‍या मनमाड शहरात मानाचे स्थान असणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 2017 पासून यंदाही सलग सातवे वर्षी भाद्रपद महा गणेशोत्सव 2023 मध्ये यंदा उत्सवाच्या 27 व्या वर्षानिमित्त गरीब रुग्णांसाठी शिल्लक औषध संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना त्यांच्याकडे उपचारानंतर शिल्लक असणारी औषधे की ज्यांची मुदत वैधता (एक्सपायरी डेट) बाकी आहे. ती श्री निलमणी गणेश मंदीरात ठेवण्यात आलेल्या शिल्लक औषध संकलन पेटीमध्ये देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. मनमाड शहरातील व परिसरातील गणेश भक्तांनी व नागरिकांनी या आरोग्य सेवा उपक्रमास भरभरुन प्रतिसाद दिला. आणि 1 महिन्यांच्या कालावधीमध्ये या औषध शिल्लक संकलन पेटीमध्ये सुमारे रु.41,000/- पेक्षा जास्त किंमतीची विक्रमी औषधे की ज्यांची मुदत वैधता शिल्लक आहे अशी संकलीत झाली. 2017 पासून आज पर्यंत सात वर्षात या उपक्रमा द्वारे ट्रस्ट तर्फे 1,00,000/- पेक्षा जास्त किमतीची औषधे संकलित करण्यात आली आहेत ट्रस्टतर्फे या औषधांचे विविध आजारानुसार वर्गीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सेवा भारती (जनकल्याण समिती) नाशिक यांच्या मार्फत दुर्गम भागात गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधे उपलब्ध करुन दिली जातात म्हणून श्री निलमणी गणेश मंदीर ट्रस्टतर्फे यंदा ही सर्व रु.41,000/- पेक्षा किंमतीची संकलीत औषधे सेवा भारती (जनकल्याण समिती )नासिक यांना ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, उपाध्यक्ष शेखर पांगुळ , विश्‍वस्त गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट यांनी सूपूर्द केली तर सेवा भारती आरोग्य आयाम नाशिक ग्रामीण प्रमुख मुकुंद पाठक,नासिक सेवा भारती सह सचिव सिमा गोसावी जनकल्याण रक्त केंद्र सह कार्यवाह डॉ रश्मी दिवे जनकल्याण केंद्र नासिक माध्यम समन्वयक (जनसपंर्क अधिकारी )सुरेश पिंगळे यांनी ही औषधे सेवा भारती तर्फे स्वीकारली याप्रसंगी सेवा भारती आरोग्य नाशिक केंद्राचे आरोग्य आयाम चे माजी प्रमुख नरहर जोशी यांनी सेवा भारती (जनकल्याण समिती )च्या वतीने निलमणी ट्रस्ट चे ऋण व्यक्त केले श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे हा गरीब रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करुन देणारा शिल्लक औषध संकलन केंद्र उपक्रम अखंडित सुरु राहणार असून सोबतच श्री निलमणी ट्रस्ट तर्फे मनमाड शहरात गरीब रुग्णांन साठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करणार असल्याचे ट्रस्टचे सचिव नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले .श्री निलमणी गणेश मंदीरातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ट्रस्टला अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त, राहुल लांबोळे, रवींद्र वास्कर,भरत छाबडा, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरां सह ज्ञात अज्ञात गणेश भक्तांन चे अनमोल सहकार्य लाभले. हा गरीब रुग्णांसाठीचा शिल्लक औषध संकलन उपक्रम यापुढेही ट्रस्टतर्फे निरंतर वर्षभर राबविला जाणार असून नागरिकांनी व गणेशभक्तांनी या उपक्रमास असाच प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त , किशोर गुजराथी ,नितीन पांडे शेखर पांगुळ, गोविंद रसाळ,प्रज्ञेश खांदाट, कृष्णा शिंपी नारायण फुलवाणी भिकाजी कुलकर्णी आदी विश्‍वस्त मंडळाने केले आहे. या कार्यक्रमास रामदास इप्पर सचिन व्यवहारे आदी मान्यवरांन सह गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
.