loader image

नांदगाव तालुक्यातील गारपीट ग्रस्त भागाची भा. ज. पा पदाधिकारी कडून पाहणी

Nov 27, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येथे झालेल्या गारपीट आणि तुफान पाऊसाने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात खुपच शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, जनावरांचे बरेच नुकसान झाले. निसर्गाच्या झालेल्या अशा प्रकोपाची तत्काळ दखल घेत आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मा.ना.डॉ.भारती ताई पवार यांचे स्वीय सहायक श्री. प्रवीणजी रौदंळ यांनी नांदगाव तालुक्यातील नुकसानी ची पहाणी केली व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. नांदगाव तालुक्यातील गारपीट ग्रस्त जामदरी, आदी भागांना या वेळी भेटी देण्यात आल्या. या वेळी पहाणी दौऱ्यात भा.ज.पा च्या जयेष्ठ नेत्या ॲड. जयश्री ताई दौंड, भा.ज.पा किसान मोर्चा चे नशिक जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, भा.ज.पा नांदगाव तालुका अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे, भा.ज.पा नांदगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, तालुका सरचिटणीस संदिप पगार, ओ.बी.सी मोर्चा चे शहर अध्यक्ष दिनेश दिंडे सर आणि भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड. जयश्रीताई दौंड यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करावे अशा सूचनाही उपस्थित सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिल्या आणि कोणत्या ही अधिकाऱ्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात कसूर केला त्याची गय केली जाणार नाही अशा सुचना त्या वेळी दिल्या व नामदार भारती ताई पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे नुकसान भरपाई मिळुन देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. राऊंदळ व भा.ज.पा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगुन अश्वस्त केले व धीर दिला. सदर पहाणी दौरा वेळी भा.ज.पा चे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्कल, तलाठी, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.