loader image

टाकळी बुद्रुक येथे सभामंडपाचे उद्घाटन संपन्न..

Mar 15, 2024

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून टाकळी बुद्रुक येथील शनी मंदिर येथे सभा मंडप मंजूर करण्यात आले होते या सभा मंडपाची भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.
लग्न कार्य किंवा सामाजिक, धार्मिक कार्यासाठी मंडप म्हणा किंवा लान्सचे भाडे आज गगनाला भिडले आहेत. आणि त्याशिवाय गत्यंतर ही नसते. दृष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनाच हा खर्च परवडत नाही. ही बाब लक्षात आल्याने आमदार सुहास कांदे यांनी संपूर्ण विधानसभा मतदार संघातल्या प्रत्येक गावात, वाड्या, वस्त्या, मंदिरासमोर शेकडो सभामंडप बांधून गोरगरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
आज तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे सभामंडपाचे भूमिपूजन बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप पवार, युवासेनेचे सागर हिरे, संचालक एकनाथ सदगीर, प्रकाश शिंदे, बाळासाहेब पवार, विक्रम फोडसे, रामेश्वर सदगीर, माणिक आहेर, पोलीस पाटील बाबुराव पवार, उत्तम पवार, साहेबराव पवार, वाल्मिक घोडके, बाबासाहेब पवार, विश्वास पवार, भाऊसाहेब शिरसाठ, चेतन खैरनार, संजय घोडके, समाधान पवार, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
.