loader image

बघा व्हिडिओ-भारती पवारांना मनमाड ने पुन्हा लीड देऊन विजयी करा : देवेंद्र फडणवीस

May 17, 2024


मनमाड:- मनमाड शहराने मागच्या निवडणुकीत भारती पवार यांना लीड दिला होता यंदाही मनमाड आणि नांदगाव शहरातील जनतेने लीड द्यावा त्यानंतर केंद्रातून व राज्यातून बरोबर विकास करण्याचे वचन मी देतो असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमाड येथे जाहीर सभेत व्यक्त केले महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी मंचावर माजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुहास कांदे,डॉक्टर भारती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी फडणवीस यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचे काम वेगळंच असतं माझा त्यांचा जुना परिचय आहे.जन सामान्यांनाचा काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. तुमच्यासाठी काम करणारा आमदार आहे त्यांनी मनमाड करासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी योजना आणली असुन तिचे केवळ 10 टक्के काम बाकी आहे ते होताच येथील दुष्काळ इतिहास जमा होईल व मनमाड करांना रोज पाणी मिळणार आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले की मोठ्या शहरात नसेल असे स्टेडियम तयार होतं आहे येथे उदयोग आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही भारती पवार यांना निवडून द्या आम्ही तुमच्यासासाठी बेअरर चेक आहोत निवडणूक होताच तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करून देईल असे आश्वासन दिले.
तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले की त्यांच्या कडून निधी आणून नाशिक, नगर, जिल्ह्यातील पाणी समस्या मार्गी लावण्याचे देखील आराखडा तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ही निवडणूक साधी नाही देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे..
एकीकडे कौरव तर दुसरीकडे पांडव आहे हे युद्ध मताच्या रुपाने जिंकायचे आहे.दुसरीकडे राहुल गांधी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली 24 पक्षाची खिचडी असल्याचे ते बोलले तर खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता सकाळी
9 वाजता एक पोपटलाल येतो आणि बडबड करून जातो त्याला विचारलं तर आमच्याकडे अनेक उमेदवार असल्याचे तो म्हणतो हे काय संगीत खुर्चीचा खेळ करून दरवर्षी एक पंतप्रधान करणार का असा टोलाही त्यांनी लगावला
या देशाला सुरक्षित ठेवेल असा पंतप्रधान निवडायचा आहे आमच्या गाडीत सर्व जाती धर्माच्या लोकांना बसविण्यासाठी जागा आहे तर दुसरीकडे फक्त इंजिन आहे त्यांच्या इंजिन मध्ये गांधी, ठाकरे, पवार यांच्यासाठीच जागा आहे
10 वर्षात मोदी यांनी चमत्कार केला 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं लोकांना पक्के घर दिले, सौचालय दिले.80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे भविष्यात
मोदी यांनी सोलर योजना आणणार आहे त्या माध्यमातून 300 युनिट मोफत मिळणार आहे कांद्या सारखा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कायमस्वरूपी मार्ग काढू असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी माजी महिला बालविकास तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा या देशात सामान्य माणसासाठी जगणारा या देशाचा पंतप्रधान आहे.त्यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवायचे आहे खरंच ही निवडणूक विकासावर होतं आहे का? पंतप्रधान मोदी यांनी या देशाचा विकास केला आहे.. शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी कोण देताय नरेंद्र मोदी सर्व जाती धर्माना सोबत घेऊन कोण चालतय छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्यची स्थापना केली त्याच धर्तीवर काम करायचे आहे
बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढली तुम्ही पहिली पांच वर्ष घरी बसून लढले तरी तुम्ही माझं स्वागत केले
कांद्याचा, सोयाबीनचा विषय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची गरज आहे फडणवीस नेहमी केंद्रात प्रयत्न करतात विरोधकाच्या भुलथापाना बळी पडू नका यांच्यातर्फे मुस्लिमना भडकविण्याचं काम केले जात आहे 10 वर्षात किती दंगली झाल्या.. मुस्लिमांना भीती दाखवून भाजपच्या जवळ येऊ देत नाही तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची ग्वाही मी देते विरोधक संविधान बदलण्याची भाषा करतात मात्र अशी भावना मोदी यांची नाही संघर्ष कोणाच्या वाट्याला येत नाही मुंढे साहेबा सोबत माझ्या वाट्याला देखील संघर्ष आला पण मागे हटवायचे नाही आता भारती पवार यांना खासदार करा असे आवाहन त्यांनी केले.तर प्रस्ताविक भाषण करताना सुहास कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या कामाची यादि वाचून दाखवली तर भविष्यात काय काय काम करायचे आहे आणि यासाठी आपल्याला निधीची गरज आहे यामुळे आम्हाला भरगोस निधी द्यावा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.उमेदवार डॉ भारती पवार यांनीही आपल्या भाषणात माझ्याकडुन तुम्हला वेळ देता आला नसेल मात्र मी विकास काम केली आहे त्यासाठी माझा वेळ गेला आहे यामुळे काही ठिकाणी जाता आले नसेल तरी तुमची बहीण व मुलगी समजुन पदरात घ्या व त्याची शिक्षा निवडणूक झाल्या नंतर द्या तुमचा राहिलेला विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असुन मला एक संधी द्या असे भावनिक आवाहन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे व डॉ भारती पवार यांच्यासह विजय चौधरी यांचा रामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर भाजपा शिवसेना रिपब्लिकन पक्ष रासपा प्रहार यांच्यासह इतर मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
.