loader image

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

Jun 30, 2024


 

मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे सलग 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने मन्सूरी यांनी शाळेच्या विदयार्थ्यांना भविष्यात कसे वर्तन करावे. या बाबत मोलाचे मार्गदर्शन करुन पुस्तके वाचना बाबत किताबे पढो आगे, वाचाल तर वाचाल असा संदेश दिला. तसेच शाळेतर्फे त्यांच्या सेवापुर्तीचा भव्य सोहळा कार्यक्रम संस्थेचे सदस्य अब्दुल करीम सलीम गाजियानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. यावेळी संस्थेच्या सचिव सायरा सलीम गाजियानी,सदस्य आयशा सलीम गाजियानी, आमीन गाजियानी तसेच शाळेतील आजी व माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या सचिव सायरा सलीम गजियानी मुख्याध्यापक शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम तसेच उपशिक्षक जगताप शानूल, शेख रब्बानी आशिकअली,नईमूद्दीन नियाजुद्दीन,शेख अखलाक अहमद मो.इब्राहिम, शेख जाविद मुश्ताक यांनी मन्सूरी अ.हमीद यांच्या शालेय कार्याबद्दल उल्लेखनीय माहिती देऊन प्रशंसा केली. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मन्सूरी अ. हमीद यांच्या कुटुंबातील सदस्य व शेजारील मित्रपरिवार, मालेगाव, निमगाव येथील बंधू व पुतणे, तसेच मालेगाव येथिल जिवलग मित्र अन्सारी अबुजर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर मन्सूरी अ.हमीद यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केली. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.आलेल्या सर्व मान्यवरांचे मन्सूरी अ. हमीद यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन ताजोद्दीन यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
.