loader image

म.रे.मा. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली..

Jul 21, 2024


 

मनमाड – येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 20 जुलै 2024 ,वार शनिवार रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. कोळी सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. विद्यालयाचे प्रभात सत्रातील सांस्कृतिक प्रमुख श्री. चेतन सुतार सर विद्यालयातील जेष्ठ शिक्षक, शिक्षिका श्री. केकान सर व श्रीमती. हंडोरे मॅडम व्यासपीठावर विराजमान होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
गुरुपौर्णिमा निमित्त विद्यालयातील विद्यार्थी वर्गामधील तपस्या बुरुकुल, रीना जाधव , मानसी सांगळे, निशा बिडगर, साक्षी शर्मा, साक्षी गवळी, रुद्र जाधव, भूमिती कडनोर, सायली साळवे, सेजल कांबळे, दिपाली कडनोर, वैष्णवी शुक्ला, यांनी जीवनातील गुरुचे महत्त्व, गुरूंचा आदर्श, व गुरूंविषयी असणारे आपले मनोविचार प्रकट केले.
ज्येष्ठ शिक्षक श्री. केकान सर यांनी वैदिक काळापासून चालत आलेली गुरु शिष्य परंपरा,ज्ञान व विज्ञान यातील फरक व त्यामध्ये गुरु शिष्य प्रवास याचे सुंदर विश्लेषण केले. मुक्ताबाई व चांगदेव यांची गोष्ट आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले.
प्रभात सत्रातील सांस्कृतिक प्रमुख श्री. सुतार सर यांनी गुरू संपूर्ण जीवनात विद्यार्थ्यांना स्वतःला कशाप्रकारे समर्पित करतो. आणि समर्पित जीवनाचा आनंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात घडवतो…याचे महत्व विशद केले. आज चा काळानुरूप बदलत जाणारा गुरू ची संकल्पना यावर विचार व्यक्त केले.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. हांडोरे मॅडम यांनी शालेय जीवनात विद्यार्थी घडवणारा गुरु आणि वास्तविक जीवनातील अनुभव देणारा गुरु याचे सुंदर विश्लेषण केले. अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा, व्यक्तिमत्व विकास घडवणारा गुरु च आहे.असे महत्व सांगितले. वैदिक काळातील व्यास ऋषी आणि गौतम बुद्ध यांचा विचारांचा परिचय त्यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कोळी सर यांनी जीवनात सुखदुःखात सक्षम करण्यासाठी गुरुचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुश्री जाधव व तपस्या बुरूकुल यांनी केले.
आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.गायकवाड मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

मनमाड : इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के. हायस्कूल अँड...

read more
मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे  सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...

read more
.