नांदगांव : मारुती जगधने सुमारे १२ तास अजंठा ते सिकंदराबाद हि प्रवासी गाडी मनमाड स्टेशनवर थांबुन असते त्या एैवजी हि प्रवासी गाडी भुसावळ जंगशन वरुन सोडावी असी मागणी होत आहे . भुसावळ व जळगाव येथून सिकंदराबादला जाण्यासाठी आठवड्यातून केवळ सोमवार, शनिवार व बुधवार असे तीन दिवस साप्ताहिक रेल्वेगाड्या आहेत. त्यातही या गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी मनमाड येथून दररोज सिकंद्राबादला धावणारी अजिंठा एक्स्प्रेस मनमाड एैवजी भुसावळ स्थानकातून सोडण्यात यावी, अशी मागणी आहे
१७०६४ सिकंदराबाद-मनमाड अजिंठा एक्सप्रेस ही गाडी सायंकाळी ७ वाजता सुटते ती मनमाड येथे सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी येते. तर १७०६३ मनमाड सिंकंदराबाद ही गाडी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता सिकंदराबादला पोचते.
यादरम्यान तब्बल १२ तास ही गाडी मनमाड स्थानकावर उभी असते. यामुळे ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सोडावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. ही गाडी भुसावळपर्यंत वाढवल्यास भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील प्रवाशांना फायदा होईल.
दरम्यान कोविड काळात बंद केलेल्या प्रवाशीगाड्यांना नांदगांव स्टेशनवर थांबा द्यावा हि प्रलंबित मागणी देखील पुन्हा करण्यात आली आहे .
दरम्यान जर अजंठा सिकंदराबाद गाडी भुसावळ जंगशन वरुन सुरु करण्याची मागणी होत आहे अजंठा एक्सप्रेसला देखील नांदगांव स्टेशनवर थांबा मिळावा असी मागणी आहे.