loader image

वाचन संस्कृती च्या विकासात मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे मोठे योगदान -सचिन जोपुळे

Dec 31, 2024


मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये *“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासकीय उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठे, विद्यालये, व महाविद्यालये सार्वजनिक ग्रंथालये यातील विध्यार्थी /विध्यार्थिनी मध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून ➖वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम 01 जाने 2025 ते 15 जानेवारी 2025 या काळात संपन्न होणार आहे याच संदर्भा ने मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये ➖भव्य ग्रंथ प्रदर्शना चा ➖शुभारंभ सरस्वती प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून करण्यात आले नाशिक विभागाचे सहाय्य्क ग्रंथालय संचालक सन्माननीय सचिनजी जोपुळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या मंचावर विभागीय संचालक सचिनजी जोपुळे मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीनजी पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा जेष्ठ संचालक नरेश गुजराथी उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मनमाड सार्वजनिक वाचनालय या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमात, शालेय,महाविद्यालयीन विध्यार्थी शिक्षक यांचे वाचन वृद्धिंगत होणे साठी विविध उपक्रम या पंधरवाड्यात आयोजित करणार आहे त्याचा विध्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगता मध्ये केले तर ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये सोशल मीडिया चे मोठे संकट असतांना वाचन संस्कृतीआणि वाचन चळवळ टिकवून तिचा सातत्याने विकास करून पुढे नेणे साठी मनमाड सार्वजनिक वाचनालया चे मोठे योगदान राहिले आहे असे सांगितले सर्व ग्रंथालये आधुनिक करण्यात साठी शासन प्रयत्न शील आहे असे सांगत विभागीय ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे वर्ष भर आयोजित होणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमां चे कौतुक केले या वेळी नरेश गुजराथी, हर्षद गद्रे सर, प्रदीप गुजराथी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले वाचनालया चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी ग्रंथ भेट देऊन जोपुळे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला दिनांक 30 आणि 31 डिसेंबर हे दोन दिवस हे ग्रंथ प्रदर्शन वाचक, शालेय, महाविद्यालयीन विध्यार्थी साठी उपलब्ध राहणार आहे या प्रदर्शन मध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, व्यवसाय, व्यापार व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा अशी सर्व विषयाची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत सचिन जोपुळे यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ दालनांची व होणाऱ्या कामकाज जी पहाणी केली या कार्यक्रमाला रमाकांत मंत्री, अक्षय सानप अजय राऊळ मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मछिंद्र साळी आदी मान्यवंरान सह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे सचिव कल्पेश बेदमुथा व सर्व संचालक मंडळा ने केले


अजून बातम्या वाचा..

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.