loader image

बिबट्याची शिंगवे येथील मंदिराकडे हजेरी

May 6, 2025


नांदगाव: मारुती जगधने

दत्ताचे शिंगवे ,मेसनखेडे मेसन्या डोंगर ,दुगाव, कोकणखेडा ,दरेगाव, निमोन, डोणगाव, रायपूर, भडाना, दुगाव, भारत वस्ती या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे चर्चा आहे या परिसरामध्ये मेसन्या नावाचा मोठा डोंगर आहे उंच डोंगर असल्यामुळे या भागामध्ये वर्दळ कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने बिबट्याचा वावर राहतो परिसरातील लोक सावधगिरीने आपले जीवन जगत असतात याच भागातील एक बिबट्या मेसण्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन जवळच असलेल्या दत्ताचे शिंगवे या मंदिराच्या परिसरामध्ये रात्री ठाण मांडून होता उंच मंदिरावरती चकचकीत फरशी वरती बिबट्या आरामात पाणी पिऊन बसला होता म्हणजे आराम करत होता हे दृश्य तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे त्यामुळे बिबट्या आता डोंगरातून थेट शिंगवे गावामध्ये मेसन खेडे भागात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही नागरिकांनी वनविभाग केली आहे.

चांदवड तालुक्यातील दुगाव नजीक असलेल्या मेसण्यानामक मोठ्या डोंगरावरती या बिबट्यांचा वावर सातत्याने असतो या डोंगराच्या टोकाला पाण्याचे एक मोठ तळ आहे आणि या ठिकाणी बारमाही पाणी असते त्यामुळे येथे सातत्याने बिबट्याचा वावर असतो येथे बिबट्या मादीसह जोडीन राहत असल्याचे नागरिक सांगतात याच्यातलाच एक बिबट्या जवळच असलेल्या दत्ताच्या शिंगवे मंदिराच्या पायऱ्यांवरती रात्रीच्या वेळेला आराम करताना सीसीटीव्हीत कैद झालाय.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.