loader image

मनमाड बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावणार मुख्यमंत्री

Jul 5, 2025


 

ई-कॅबिनेटच्या धर्तीवर बाजार समितीत आयोजित झुम मिटींगबद्दल विशेष कौतुक.

गेल्या काही महिन्यांपासुन मनमाड बाजार समितीतील प्रलंबित कर्मचारी पगार, शेतकरी हिताची अनेक विकासकामे प्रशासकीय अडचणींमुळे प्रलंबित असल्याने बाजार समितीच्या माध्यमातुन शेतकरी बांधवांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

सदर सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपाचे बाजार समिती सभापती दिपक गोगड यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपुर्ण प्रलंबित विकासकामांचा विस्तृत अहवाल मुख्यमंत्री महोदय यांचे कडे सादर केला व त्यांचे सोबत चर्चा करून सदर प्रलंबित विकासकामे त्वरीत मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिले. संपूर्ण अहवालाचे अवलोकन करून मुख्यमंत्र्यांनी त्वरीत सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

भाजप सभापती दिपक गोगड यांनी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पगार, शेतकरी बांधवांसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतकरी बांधवांना घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने बाजार समितीची माहिती मिळावी यासाठी सॉफ्टवेअर, बाजार समितीचे नुतन कार्यालयात स्थलांतर, बाजार समितीचे कामकाज पारदर्शक चालावे यासाठी सचिव व लेखापाल भरती, आदि प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता येवुन समितीच्या जनमानसातील प्रतिमा उंचवावी म्हणुन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या ई-कॅबीनेटच्या धरतीवर बाजार समितीची सभा झुम मिटींगद्वारे घेण्याचा निर्णय राज्यात प्रथमच मनमाड बाजार समितीने घेतल्याची माहिती देखील सभापती गोगड यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या वैशिष्टयपुर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी भाजप सभापती दिपक गोगड यांचे विशेष कौतुक देखील केले.


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.