मनमाड (प्रतिनिधी), ता. २० –
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला केला. पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यात योगेश खरे, किरण ताजने व अभिजित सोनवणे हे पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनमाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदन देण्यात आले.
पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्यांच्यावर होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे देशातील लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई चे नाशिक विभागीय सचिव अमोल खरे, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जेष्ठ पत्रकार सतीश शेकदार, तालुका उपाध्यक्ष नरहरी उंबरे, तालुका कार्याध्यक्ष उपाली परदेशी, तालुका सरचिटणीस निलेश वाघ, तालुका संघटक अशोक बिदरी, गणेश केदारे, योगेश म्हस्के, राजेंद्र धिंगाण, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, जेष्ठ पत्रकार संदीप देशपांडे, सहसरचिटणीस रुपाली केदारे, स्वाती गुजराथी, नैवेद्या बिदरी, प्रिया परदेशी, दीपाली खरे, तुषार गोयल,सॅमसन आव्हाड, आंनद बोथरा, मुजमिल इनामदार, पंकज वाले, आशिष मोरे, विशाल मोरे, मिलिंद वाघ, पंकज जाधव, विनायक कदम, प्रणव हरकल, सुशांत राजगिरे
आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.
लोकशाही टिकवायची असेल, तर पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे – असा ठाम संदेश या निषेधाद्वारे देण्यात आला आहे.
फोटो :
मनमाड : पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदन सादर करताना नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य.