मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मेघा संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक व मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला
आकांक्षा किशोर व्यवहारे ने त्याच वजनी गटात रौप्यपदक पटकावले
६९ किलो वजनी गटात प्रांजल अशोक कुणगर हिने रौप्यपदक पटकाविले
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या














