Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Jan 12, 2026

मनमाड येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.इं दोर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री.विवेक देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, हिंदवी स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना केवळ युद्धकलाच शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. एवढेच नव्हे तर शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार अतिशय कुशलतेने पाहणाऱ्या त्या एक आदर्श प्रशासक होत्या. आजच्या काळात जिजाऊंचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. “प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली, तरच प्रत्येक घरात एक शिवाजी घडेल.” आजच्या स्त्रियांनी जिजाऊंचा स्वाभिमान आणि धडाडी अंगी बाळगणे आवश्यक आहे.

भारत हा युवकांचा देश आहे. भारतीय संस्कृती जगात पोहचविणारे स्वामी विवेकानंद हे आजच्या युवकांचे आदर्श असले पाहिजे. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती आणि वेदांची खरी ओळख करून दिली. त्यांनी केवळ धर्मावरच नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर अधिक भर दिला.त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा विकास होय. तुम्हाला जर स्वतःवर विश्वास नसेल, तर तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही, असे त्यांचे मत होते.आत्मविश्वास हाच यशाचा खरा मार्ग आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या संकटांनी खचून जातो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला बळ देतात. “शंभर वेळा अपयश आले तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा,” हा त्यांचा सल्ला आजही तितकाच लागू होतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.पावडे यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी.व्ही सोनवणे, प्रा. एस.जी.सुखदेवे, डॉ. संजय चिंचोले, महाविद्यालायचे कुलसचिव समाधान केदारे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.शरद वाघ यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे...

read more
बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे...

read more
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुका...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]