Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026

(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

“जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा” हे भावस्पर्शी गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले. त्यांना संगीतसाथ कल्पना आहिरे यांनी दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा विचार या मातीत रुजवला. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. त्या सामान्य जनतेच्या समस्या स्वतः न्यायनिवाडा करून सोडवत असत. त्या स्त्रीशक्तीचे प्रतीक व सक्षम मार्गदर्शक होत्या, असे मनोगत उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी व्यक्त केले.

उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, भारत सरकारने १९८४ पासून १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रप्रेमाचा जगभर प्रसार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली असून “शिवभावे जीवसेवा” हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती संकलन नसून माणूस घडविणे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच “जेवढा मोठा संघर्ष, तेवढाच विजय भव्य” हा मोलाचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजमाता जिजाऊंचे आयुष्य केवळ इतिहास नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम या सत्त्वगुणांचे संस्कार त्यांनी छत्रपती शिवरायांवर केले, असे त्यांनी नमूद केले.

पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” तसेच “जीवनात जोखीम पत्करा; जिंकलात तर नेतृत्व करा, हारलात तर इतरांना मार्ग दाखवा” हे विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव...

read more
दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

योगेश म्हस्के मनमाड : येथील उद्योजक आणि सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी 600 किमीचा सायकलिंग पुर्ण करून...

read more
श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थान नांदगाव नवरात्र निमित्त दुर्गा माता दौड संपन्न

श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थान नांदगाव नवरात्र निमित्त दुर्गा माता दौड संपन्न

नांदगाव सोमनाथ घोगांणेहिंदुराष्ट्राच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा प्रभू श्रीरामरायाच्या व छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]