Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात एकदिवसीय आरोग्य शिबिर संपन्न

Jan 16, 2026

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे विशाखा व सखी सावित्री समिती अंतर्गत एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमास उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मनमाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश देवरे व डॉ. संगीता काळे उपस्थित होते. डॉ. योगेश देवरे यांनी तणावमुक्त जीवनशैली, व्यसनमुक्ती, संतुलित आहार व नियमित व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ.संगीता काळे यांनी विद्यार्थिनींना पीसीओडी याबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना संतुलित आहार, नियमित व्यायाम व आरोग्यविषयक सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी संतुलित आहार आणि चांगल्या सवयी यांचे महत्व तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष अहिरे, महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे, विशाखा समिती अध्यक्ष श्रीमती अनुपमा पाटील तसेच सखी सावित्री व विशाखा समिती सदस्या श्रीमती सविता पवार, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती योगिता शिंदे यांनी तर आभार सौ.शितल हिरे यांनी व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]