Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

Feb 25, 2026

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने

आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता. नांदगाव) येथील चाळीसगाव-नांदगाव रोडवरील टोल नाका शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर बंद पाडण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी हे पाऊल उचलण्यात आले.

​नेमके प्रकरण काय?

​गेल्या अनेक दिवसांपासून या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जात आहे. वारंवार मागणी करूनही व्यवस्थापनाने पगारवाढीकडे दुर्लक्ष केले. तसेच राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणचे पथदीप (Street Lights) बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांदवड-मनमाड आणि नांदगाव-चाळीसगाव या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे आत मध्ये आलेली आहे, ती वाहतुकीला अडथळे ठरत आहेत, अनेक दुभाजकांवर काटेरी कुंपण तयार झाले आहेत ते देखील वाहन धारकांना त्रासदायक ठरत आहेत, अनेकांना त्याचे तोंडाला फटके लागतात, अनेक वाहनांना ओरखडे तयार होतात .

​आंदोलनाचे नेतृत्व आणि इशारा

​युवासेना तालुका प्रमुख फरहान खान, कामगार विकास सेना अध्यक्ष सुनील जाधव आणि शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल व्यवस्थापक गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. “जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि रस्त्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद राहील,” असा आक्रमक पवित्रा यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतला.

​आंदोलनाप्रसंगी रवी देवरे, नूतन कासलीवाल, प्रकाश शिंदे, शशिकांत सोनवणे, बाबा ढोमसे, भाऊराव बागुल, अय्याज शेख, महेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि कामगार वर्ग उपस्थित होता.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]