Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून दिवाळीनिमित्त स्वच्छतेचा जागर

Nov 22, 2026

‘ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा, पर्यावरणाचे रक्षण करा!’

प्रकृती स्कूलमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ओला कचरा आणि सुका कचरा याविषयी जनजागृतीपर उपक्रम राबविला. *कचरे को अलग करे, धरती को स्वच्छ बनाये!* या आगळावेगळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना ओला व सुका कचरा यातील फरक समजावून सांगितला. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करता येते, तर सुका कचरा वेगळा गोळा करून त्याचा पुनर्वापर करता येतो, याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली. तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते, स्वच्छता राखली जाते आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय टाळता येतो, हा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. शाळेचे मुख्याध्यापक सौरभ जैन सर तसेच उपमुख्याध्यापिका कु.प्रीती परदेशी मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग शिक्षिका सौ.अर्चना चौथमल, सौ.सोनिका पटेल, सौ.सविता वाघ, यांनी विद्यार्थ्यांना या प्रकल्पासाठी योग्य मार्गदर्शन केले. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मनमाड शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांची जाणीव झाली. तसेच प्रत्यक्ष समाजात जाऊन माहिती देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. दिवाळीच्या सुट्टीतील या आगळ्यावेगळ्या गृहपाठातून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता आणि जलसंवर्धनाचा संदेश घरोघरी पोहोचवला.

विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः शिकण्यापुरते मर्यादित न राहता समाजालाही स्वच्छतेचा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले. विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या या जनजागृतीपर उपक्रमाचे घरातील सदस्यांनी उत्स्फूर्त कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]