loader image
[ays_poll id=7]

वांद्रे-कुर्ला संकुल – JVLR पूल दुर्घटनेची चौकशी करा; एकनाथ शिंदेंचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

Sep 17, 2021


वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणारा निर्माणाधिन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात 14 कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी ‘झालेली ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.


अजून बातम्या वाचा..

नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती

नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती

अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा विवाह संपन्न...

read more
श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक

मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या ॐ मित्र मंडळ...

read more
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु...

read more
.