Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विविध मागण्यांसाठी भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन !

Oct 19, 2021

नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिव्यांग, विधवा निराधार, जेष्ट नागरिक यांची संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी पेंशन मागील ४ ते ५ महिन्यांपासून थकीत आहे, ती लवकरात लवकर अदा करण्यात यावी तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करुन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, या सह विविध मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख, भाजपा दिव्यांग आघाडी मनमाड शहर उपाध्यक्ष कमलेश कलापुरे, संजय साबळे, संतोष पगारे, दौलत बोबडे, गौतम पगारे, आनंंद निकम, जिलानी आत्तार, वाल्मिक देडगे, सुशिला व्यवहारे, भिकंन शेख, सैय्यद इब्राहिम, सुभाष सांगळे, हर्ष कुबेरजी, रुकय्या शेख, योगेश रानडे, अर्षद शेख, रमेश पाटील, फारूक शेख, राजेश चौधरी, गौतम जोगदंड, शान्ताराम आहिरे, नूर मोहम्मद शेख, पत्रकार अनिस भाई शेख आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

निष्ठावंत भाजपा पदाधिकारी नीळकंठ त्रिभुवन यांचे कन्येच्या विवाह प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांची उपस्थिती

मनमाड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद ओम मित्र मंडळ आणि नंतर भारतीय जनता पार्टी...

read more
परशुराम प्रतिष्ठान व सावरकर प्रेमी जनतेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

परशुराम प्रतिष्ठान व सावरकर प्रेमी जनतेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी मनमाड शहरातील चिंतामणी मंगल कार्यालय येथे श्री परशुराम प्रतिष्ठान...

read more
महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची पोत ओरबाडणाऱ्या कोपरगावच्या चोरट्यांना अटक : परिसरातील तरुणांची समयसूचकता

महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची पोत ओरबाडणाऱ्या कोपरगावच्या चोरट्यांना अटक : परिसरातील तरुणांची समयसूचकता

नांदगाव साकोरा रोडवर मंगळवारी सायंकाळी पल्सर मोटारसायकलवरून येवून महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]