Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

२१ ऑक्टोबर – ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ !

Oct 21, 2021

आपले कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करणाऱ्या  देशातील सर्वच पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २१ ऑक्टोबर  हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून पाळला जातो.

‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संतशिरोमणी तुकोबारायांच्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे केवळ आपल्या देशातील नव्हे तर थोडय़ाफार फरकाने जगभरातील सर्वच देशांतील पोलीस यंत्रणांची स्थिती आहे. आपल्या खंडप्राय देशाचा विचार करता कोणत्या ना कोणत्या प्रदेशामध्ये दर दिवशी एखाद-दुसऱ्या पोलीस जवानाला हौतात्म्य पत्करावे लागते.

आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करणाऱ्या आपल्या देशातील सर्वच पोलीस दलातील हुतात्मा अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘२१ ऑक्टोबर’ हा दिवस ‘राष्ट्रीय पोलीस शहीद दिन’ म्हणून आपल्या देशातील प्रत्येक पोलीस घटकामध्ये पाळण्यात येतो. २१ ऑक्टोबर या दिवसाला पोलिसांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी भारतीय पोलीस दलामधील सीआरपीएफ तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० बहादूर पोलीस जवानांना देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमवावे लागले. आपल्याजवळील अपुऱ्या साधनसामग्रीनिशी अद्ययावत शस्त्रसुविधांनी सुसज्ज असलेल्या बलाढय़ चिनी सनिकांशी ते लढले. लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग’ या समुद्रसपाटीपासून १५ हजार फूट उंचीवरील दुर्गम ठिकाणी बर्फाळ खिंडीमध्ये निकराने मुकाबला करीत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या घटनेचे स्मरण म्हणून संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस अधिकारी आणि जवान ‘हॉट स्प्रिंग, लडाख’ येथे प्रतिवर्षी २१ ऑक्टोबर रोजी जातात व त्यांना मानवंदना देतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे.

या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या देशामध्ये दरवर्षी कर्तव्य बजावीत असताना धारातीर्थी पडलेल्या सर्वच पोलीस अधिकारी आणि जवानांना ‘२१ ऑक्टोबर’ रोजी देशातील सर्व पोलीस घटकांमध्ये स्मृतिस्तंभासमोर एकाच वेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक हुतात्म्याच्या नावाचे स्मरण करून त्यांना मानवंदना दिली जाते.

आजवर देशभरात अनेक पोलीस बांधवांनी कर्तव्य बजावताना प्राणांची बाजी लावून हौतात्म्य पत्करले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पोलिसांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामधील खासकरून नक्षलप्रवण क्षेत्रांमध्ये अनेक शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचे तसेच २००८ मध्ये मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात काही पोलीस अधिकारी व शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या जवानांनी धाडस दाखवून पत्करलेल्या हौतात्म्याचेही दरवर्षी कृतज्ञ महाराष्ट्र व देश स्मरण करतो.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

येवला तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला....

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची आष्टेडू आखाडा आणि यूंग मुन दो विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
* महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनची मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फ़े अभियंता दिन साज़रा*

* महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनची मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट तर्फ़े अभियंता दिन साज़रा*

१५/९/२०२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी सर मोक्षगुंडम...

read more
अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन शाखा मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.

अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन शाखा मनमाड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दिनांक १५/०९/२३ रोजी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा आणि अल्ट्राटेक सिमेंट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]