Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हायटेक कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन!

Oct 24, 2021

चांदवड तालुका व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल चांगल्या दरात विक्री करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालयाचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.भारतीताई पवार यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे राहणार आहेत.

नवीन कार्यालय अत्यंत हायटेक पद्धतीचे असुन प्रशस्त सभापती, उपसभापती व सचिव दालन, प्रशस्त मिटिंग हाँल, बाजार समितीच्या बाजारभावा संदर्भात अपडेट व्यवस्था असून गुरुवारपासून सदर कार्यालयात बाजार समितीचे कामकाज सुरू होत आहे. कार्यक्रमास चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितिन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, समस्त संचालक मंडल तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व हमाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावे!

नाशिक :- केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या...

read more

पोलीस स्मृती दिनानिमित्त माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन

नाशिक: देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण...

read more

मंदिर एवढे दिवस का बंद होती याचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करणार -डॉ. भारती पवार यांचा ठाकरे सरकारला टोला

रुग्णांची संख्या कमी झाल्या नंतरही राज्यात अनेक दिवस मंदिरे बंद होती. ती उघडावी म्हणून भाजपने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]