Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड च्या कार्यकर्त्यांचा ना भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश!

Jan 17, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे असलेले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात सटाणा येथील भाजप कार्यकर्ते तर मनमाड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण,माजी आमदार संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडूनाना सोनवणे, नांदगांव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार दिपक गोगड, माजी सरपंच अरुण सोनवणे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे, अनिल चव्हाण, गणेश पवार, सुयोग अहिरे, परेश देवरे, चेतन देवरे, नाना शिंदे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, योगेश जाधव, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यात यावी. ज्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल तसेच लोकहिताची सर्व कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत चौंधाने, ता.बागलाण येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच प्रकाश मोरे, वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन भगवान मोरे, संजय मोरे, संजय शेवाळे, प्रवीण मोरे, मच्छिंद्र मोरे, भगवान मन्साराम मोरे, बाळू मोरे, श्यामकांत मोरे, दत्तू मोरे, मुरलीधर खैरणार, एकनाथ मोरे, रोशनी मोरे, विमलबाई मोरे, दिनेश मोरे, आप्पा पवार, खंडू मोरे, मनोहर मोरे, राहुल वाघ, मोरे नगर, ता.बागलाण येथील भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व माजी सरपंच सुरेश आहिरे, विनोद बोरसे, कमलाकर वाघ, राज वडजे, रवि बोरसे, दादा बोरसे, गुलाम शेख, धनराज वाघ, अजित खैरनार, शंकर देवरे, बापू मोरे, प्रभाकर मोरे, राजेंद्र मोरे
यांनी तर मनमाड, ता.नांदगाव येथील युवा सल्लामंच संस्थापक अध्यक्ष शुभम गायकवाड, युवा सत्तामंच शहराध्यक्ष सागर राजगिरे, श्रीराज कातकाडे, राहुल गवळी आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]