Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Mar 11, 2022

  आज येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ(Farewell day celebration)आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने तसेच साविञीबाई फुले,माता सरस्वतीच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.या कार्यक्रमास जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य श्री.मणी चावला सर ,जेष्ठ शिक्षिका रिटा उबाळे, सुषमा काळे,वैशाली सोनवणे तसेच सर्व सहकारी  शिक्षक -शिक्षिका उपस्थित होत्या.  विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी,शाळेविषयी  असलेल्या आपल्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या ,तसेच रिटा मॅडम,ललवाणी सर यांनी आपल्या  मनोगतातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. तसेच शैलेंद्र दामले सर,व सरोज ञिभूवन मॅडमानी सुंदरगीत सादर केले या  गिताने सर्व वातावरण भावुक करून टाकले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छान असे गृप डान्स  सादर केले. मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजनही  करण्यात आले होते.
       निरोप समारंभाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दहावीच्या  विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यांच्या वर्षभराच्या  यशाचा आढाव्यानुसार स्कूलचे प्राचार्य  व शिक्षक यांच्या सहमताने विद्यार्थ्यांनची निवड करून विद्यार्थ्यांचा केलेला गौरव.यामधे HELPING HAND AWARD – सोहम मोकळ,PRECIOUS GEM AWARD-  यश मोरे, SIGNIFICANT AWARD- स्नेहा गायकवाड, PERFECTLY PRESENT AWARD- सान्वी जोशी,  CONSISTENT AWARD- मेहेक काला, STUDENT OF THE YEAR- संस्कृती चव्हान,
ETIQUETTE AWARD- श्रृती निकम, STAR OF JTKEMS ( BOY) अनस शेख, STAR OF JTKEMS (GIRL) संस्कृती चव्हान या विद्यार्थ्यांना  पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका राजपूत, कविता चौधरी मॅडमांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
    सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनिलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा,संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री. मणी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी होणा-या  दहावी
बोर्डाच्या परीक्षेसाठी  शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह निमित्त ‘ पक्ष्यांचे संरक्षण ‘ या विषयावर वेबिनार संपन्न

मनमाड महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह निमित्त ‘ पक्ष्यांचे संरक्षण ‘ या विषयावर वेबिनार संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या प्राणीशास्त्र...

read more
नांदगांव जिल्हा बँकेच्या दालनात भरला शाळेचा वर्ग बँकेकडे  साकोरा येथील क. भा. पाटील  शाळेचे पैसे अडकले

नांदगांव जिल्हा बँकेच्या दालनात भरला शाळेचा वर्ग बँकेकडे साकोरा येथील क. भा. पाटील शाळेचे पैसे अडकले

नांदगांव सोमनाथ घोगांणे एरवी गुरुजी नाही किंवा मोडकळीस आलेली शाळा या कारणास्तव म्हणून शिक्षण...

read more
मनमाड चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. सुहास कांदे चे भगिरथ प्रयत्न करजंवण योजनेचे काम प्रगतीपथावर

मनमाड चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. सुहास कांदे चे भगिरथ प्रयत्न करजंवण योजनेचे काम प्रगतीपथावर

नांदगाव सोमनाथ घोगांणे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत...

read more
अवकाळी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण

अवकाळी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदग़ाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी सन २०२२ झालेल्या अवकाळी गारपीट च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]