राज्याचे हेविवेट नेते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगनरावजी भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या पदाधिकार्यांनी येवला येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी आनंद बोथरा यांनी ना.भुजबळ यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देण्यार्या फोटोंचे संकलन केलेली फोटो फ्रेम भेट स्वरुपात दिली. आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात देखील ना.भुजबळनी सदर फ्रेम मधील सर्व फोटोंचे अत्यंत उत्साहाने निरीक्षण केले व फ्रेमच्या मांडणी बद्दल आनंद बोथरा यांचे विशेष कौतुक देखील केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, योगेश जाधव, अल्प.सेलचे हबीब शेख, ओबीसी सेल चे शुभम आहेर, अक्षय देशमुख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.
मांडवड च्या शेतकर्यांचे उपोषण मागे
मांडवड येथे गारपीट व नुकसान अनुदानासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाची आमदार कांदे...









