loader image
[ays_poll id=7]

महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका : येत्या २ आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश

May 4, 2022


मुदत संपलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोवर निवडणुका न घेण्याचा ठराव विधीमंडळात संमत करण्यात आला. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने व त्यासाठी २ आठवड्यांचा अवधीही दिला आहे. या आदेशाचे पालन करीत आता राज्य निवडणूक आयोगाला येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.

मार्च २०२० च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबतही मंत्रिमंडळ बैठक आणि विधीमंडळात प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार राज्य सरकार प्रभाग रचना तयार करेल आणि निवडणूक आयोग त्याची अंमलबजावणी करेल. मात्र,आता न्यायालयाने जुनी प्रभाग रचनाच कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याचे निश्चित केले. त्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याचे राज्य सरकारने ठरविले. त्यास विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही पाठिंबा दिला. आणि आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह एकूण १८ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. या ठिकाणी राज्य सरकारने परीक्षक नेमले आहेत. या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती.

यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करावी असे निर्देश दिले आहेत.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे...

read more
बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे...

read more
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी...

read more
.