नांदगाव 56 खेडी पाणीपुरवठा योजना ही कालबाह्य झाल्यामुळे अनेक वेळा नादुरूस्त होणे, पाणी वितरणात व्यत्यय येणे, नियमित पाणीपुरवठा न होणे अशा अनेक अडचणी निर्माण होत होत्या. व नागरिकांना तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागत होता, याशिवाय परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या वर पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सातत्याने ५६खेडी पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण व नवीन २२गावांचा समावेश करून ७८ खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.आमदारांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी ७८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मंजुरीची अधिकृत प्रत आ.सुहास आण्णा कांदे यांच्याकडे सोपवली.
ही योजना जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मंजूर झाली असून योजनेची अंदाजे २६२.४६७२ किंमत आहे.
या योजनेद्वारे दररोज ५५ लिटर दरडोई पाणी मिळणार आहे मतदारसंघातील जनतेच्या प्रमुख गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करत असून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क असल्याने प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचावे ही माझी ईच्छा आहे. आता लवकरच योजनेचा शुभारंभ होऊन नागरिकांना नियमित व मुबलक पाणी मिळेल असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले आहे.
योजनेत समाविष्ट गावे पुढील प्रमाणे
नांदगाव मालेगाव देवळा तालुक्यातील ५६ गाव योजनेत समाविष्ट गावे
साकोरी, पाथर्डी,निमगुळे,डुबगुले, मथुरपाडा,भुईगव्हाण, अजंदे, गिलाने, मळगाव, खायदे,जेऊर,जाटपाडे,निमगाव बुद्रुक,निमगाव खुर्द, ज्वार्डी बुद्रुक, येसगाव खुर्द, येसगाव बुद्रुक, चौकट पाडा, निंबायती,घोडेगाव, मेव्हणे, वर्हाणे, वरहानेपाडा, जळगाव निं. चोंडी, सावकारवाडी, मांजरे, टाकळी, सोनज,शिरसोंडी, सौंदाणे, नांदगाव,झाडी,एरंडगाव,गंगाधरी,बाबुळवाडी, डॉक्टरवाडी, जळगाव खुर्द, पिंपरखेड, परधाडी, गणेशनगर, साकोरा,पिंपरी हवेली, हिंगणे देहरे, मानिकपुंज, हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक, मांडवड, गिरणा नगर, श्रीराम नगर, न्यू पांझण,जामदरी,कळमदरी, वाखारी, पिंपळे, जळगाव खुर्द, देवळा तालुक्यातील वर्हाळी तिसगाव.
या गावांचा समावेश आहे.
तर मल्हार वाडी व १६ गावांमध्ये क्रांतीनगर बानगाव बुद्रुक बाणगाव खुर्द मोरझर भवरी दहेगाव पोही खिर्डी पातोडे मल्हारवाडी फुले नगर गणेश नगर आझाद नगर टाकळी बुद्रुक टाकळी खुर्द सोयगाव तांदुळवाडी वडाळी बुद्रुक वडाळी खुर्द या गावांचा समावेश असून या गावातील वाड्या वस्त्यांच्या यात समावेश आहे.
एकूण : –
ता.मालेगाव
गावे ३७ वाड्या वस्त्या १५
ता.नांदगाव
गावे २१ वाड्या वस्त्या ६
मल्हारवाडी + १७ गावे ५ वस्त्या
देवळा गावे २ वाडी १
असा समावेश आहे.













