loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेतील गळती रोखण्याचे आव्हान : आदित्य ठाकरेंची आजपासून निष्ठा यात्रा

Jul 8, 2022


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी आदित्य निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आणि मुंबईतल्या 236 शाखांमध्ये जाऊन ते शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य हे शाखाशाखांमधील शिवसैनिकांशी संवाद साधतील. तसंच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ते भेटीगाठी आणि मेळावे घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतील.

शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभर शिवसैनिकांची द्विधा मनस्थिती आहे. अशात अजूनही शिंदे गटामध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. काल ठाण्यात 66 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. सोबतच काही खासदार देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील सतर्क झाले आहेत. त्यांनी देखील बैठकांचा सिलसिला लावला आहे. ते स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

आज संजय राऊत हे नाशिकपासून डॅमज कन्ट्रोलला सुरुवात करणार आहेत. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आहेत. आज शुक्रवारी पदाधिकारी बैठका, पत्रकार परिषद घेणार आहेत. तर शनिवारी कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
.