loader image
[ays_poll id=7]

सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

Sep 11, 2022

लासलगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर नाममात्र शुल्क आकारून पाण्याच्या एटीएमद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला असून, परिसरातील नागरिकांनी या शुद्ध पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष दिंडोरकर यांनी केले आहे.

लासलगाव शहरात होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कारणांमुळे उशिराने होत आहे तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळांद्वारे येणारे पाणी हे अशुद्ध असल्याने साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुवर्णकार तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाण्याच्या एटीएमद्वारे पाच रुपयांत दहा लिटर व दहा रुपयांत वीस लिटर शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सचिन मालपाणी, गोटुशेठ बकरे, दीपक खैरे, संदीप उगले, अजहर पठाण, संजय सोनवणे, संजय खरोटे, मुन्ना भाई, राधेश्याम वर्मा, जगदीश वडनेरे, सन्नी छाबडा, यश पवार, संतोष दिंडोरकर, गणेश दिंडोरकर, श्रीराम दिंडोरकर व परिवार उपस्थित होता.

अजून बातम्या वाचा..

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.