एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नाशिक- २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथे आज योगा शिक्षिका कुसुम मनीष पडोळ यांनी महिलांना मार्गदर्शन करून योगाभ्यास घेतला पौष्टिक आहाराबरोबर उत्तम आरोग्यासाठी योगा ही तितकाच महत्त्वाचा आहे घरातील महिलांसाठी योगा महत्त्वपूर्ण आहे कारण घरातील महिला निरोगी असतील तर पूर्ण कुटुंब निरोगी व सुदृढ राहते महिला घराचा पाया असते व पाया हा भक्कम असला तर त्यावर भक्कम इमारत उभी राहते म्हणुन आज अंगणवाडी महिलांसाठी योगा घेण्यात आला,या कार्यक्रमाचे आयोजन सेविका शितल बाविस्कर,,मदतनिस जिजाबाई मोरे यांनी केले.