loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Apr 10, 2023


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयातील महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान “या विषयावर माननीय प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  

माननीय तज्ञ मार्गदर्शक श्रीमती अशुमती लोहारकर, ठाणे येथील वुई ऑल इंडिया असोसिएशन क्लबच्या संचालिका,यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी ऑनलाइन क्लासेस, कोर्सेस,मार्केटिंग वर्चुअल क्लास रूम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिजिटल क्षेत्रातील क्रांती व त्याचबरोबर महिलांचा यामध्ये असणारा सहभाग याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. विद्यार्थिनींनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले करिअर निश्चित करावे यासाठी आवाहन केले.

तज्ञ मार्गदर्शक श्रीमती संगीता माळी, भारतीय आयुर्विमा मंडळ मनमाड शाखेच्या असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसर यांनी विद्यार्थिनींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व भविष्यकाळासाठी योग्य ती गुंतवणूक कशी करावी व गुंतवणुकीचे फायदे कसे असतात याविषयीची उत्कृष्ट माहिती कोविड काळाचा संदर्भ देऊन स्पष्ट केले.

श्रीमती पवार, भारतीय आयुर्विमा मंडळ मनमाड शाखेच्या अधिकारी यांनी विद्यार्थिनींना शिकत असताना आर्थिक दृष्ट्या कसे सक्षम होता येईल याविषयीची माहिती दिली .त्याचबरोबर एलआयसी मध्ये सुद्धा स्त्रिया व विद्यार्थिनी कसे काम करू शकतात व स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकतात याविषयीची उदाहरणे देऊन वित्तीय सक्षमता कशी असते याविषयीची माहिती विशद केली. 

     आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी स्त्रियांविषयी गौरव उद्गार काढून म्हंटले की स्त्री ही कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व आर्थिक घडी व्यवस्थित राहावी म्हणून सदैव झटत असते. स्त्रियांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे व त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थिनींनी आपले करिअर निश्चित करावे असे आवाहन केले.

  1. या कार्यशाळेचे संयोजन महिला कल्याण व तक्रार विभागाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ. कविता काखंडकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती वर्षराणी पेढेकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती डॉ. आरती छाजेड यांनी केले. कार्यक्रम संपन्न होण्याकरीता हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे, डॉ. गणेश गांगुर्डे ,डॉ. मिलिंद अहिरे प्रा.डि.वी. सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती पालवे, सुपरवायझर प्रा.फंड, महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्या, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री,हिंदवी स्वराज्य...

read more
बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे...

read more
बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे...

read more
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी

कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी...

read more
.