loader image

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविकेचे विद्यापीठस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक

Sep 25, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील चंदा मनोज राम स्वयंसेविकेची भित्तिचित्र (पोस्टर मेकिंग) या स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालय स्तर, जिल्हास्तर व विद्यापीठ स्तरावर ‘ मेरी माटी, मेरा देश ‘ उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. पोस्टर मेकिंग या स्पर्धेत चंदा हिने वरील सर्व स्तरावर आकर्षक असे भित्तिचित्र एका तासामध्ये काढून रंग देऊन पूर्ण केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तिचे प्रथम क्रमांक आले. महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरीय पातळीवर गाजवणाऱ्या या स्वयंसेविकेचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ.प्रशांतदादा हिरे, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.अद्वय आबा हिरे, संपदादीदी हिरे, प्राचार्य हरिष आडके, डॉ. व्ही एस मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. बी. एस देसले, कुलसचिव समाधान केदारे आदींनी स्वयंसेविकेचे अभिनंदन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ सुरेश गोसावी सर व प्र कुलगुरू मा.डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते भित्ती चित्र स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार स्वीकारताना कु. चंदा मनोज राम

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.