loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत कम्प्युटर मॉनिटर भेट

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत कम्प्युटर मॉनिटर भेट

मनमाड - शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचा वाढदिवस बुधलवाडी येथे गणेशभाऊ...

read more
शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटीची बैठक आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न

शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटीची बैठक आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज शुक्रवार रोजी येथील आमदार कांदे यांच्या संपर्क...

read more
पोषण माह २०२२ अंतर्गत त्रिमुर्ती चौक,सिडको नाशिक येथे “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन” – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

पोषण माह २०२२ अंतर्गत त्रिमुर्ती चौक,सिडको नाशिक येथे “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन” – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक- २ ,अंगणवाडी क्र.११,त्रिमुर्ती चौक ,सिडको...

read more
बघा व्हिडिओ – दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : अंबादास दानवे यांनी घेतला विरोधकांचा समाचार

बघा व्हिडिओ – दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : अंबादास दानवे यांनी घेतला विरोधकांचा समाचार

मनमाड : शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावरच होत असतो. ही शिवसेना प्रमुखांपासूनची परंपरा...

read more
मनमाड शहर भाजपा व ग्रामीण उपजिल्हा रुग्णलय यांचे संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा व ग्रामीण उपजिल्हा रुग्णलय यांचे संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने भाजपा तर्फे सेवा पंधरवडा सुरू...

read more
.