loader image

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

Mar 13, 2024


दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय आरोग्य राज्मंत्री मंत्री डॉ भारतीताई पवार यांना लोकसभेच्या पुन्हा संधी देण्यात आली आहे.

देशात निवडणूक आयोग लवकरच देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळे पक्ष त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर करू लागले आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. याद्वारे भाजपाने १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यापाठोपाठ भाजपाने आता त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपाने पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलं नव्हतं.

त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजपाच्या उमेदवारांची नावं जाणून घेण्याची उत्सुकता होती. अशातच भाजपाने आज त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार

मंत्री भारतीताई पवार – दिंडोरी यांना पुन्हा संधी मिळाली आहे हिना गावित यांना नंदुरबार, सुभाष भामरे- धुळे, स्मिता वाघ – जळगाव, रक्षा खडसे – रावेर, अनुप धोत्रे – अकोला, रामदास तडस – वर्धा, नितीन गडकरी नागपूर, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, प्रतापराव चिखलीकर – नांदेड, रावसाहेब दानवे – जालना, कपिल पाटील – भिवंडी, पियूष गोयल – उत्तर मुंबई, मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व, मुरलीधर मोहोळ – पुणे, सुजय विखे पाटील – अहमदनगर, पंकजा मुंडे – बीड, सुधाकर श्रृंगारे – लातूर, रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा आणि संजयकाका पाटील यांना सांगलीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.दरम्यान, भाजपाने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह भाजपाने देशभरातील इतर राज्यांमधील ५२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये कर्नाटकमधील २० उमेदवार, मध्यप्रदेशातले पाच, त्रिपुरातला एक, दादरा आणि नगर हवेलीमधील एक आणि तेलंगणमधले ६ उमेदवार जाहीर केले आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व. रेणुका...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल...

read more
नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
.